
महिन्याच्या शेवटी १२ वीचा निकाल लागण्याची शक्यता
दहावीचा निकाल मागील आठवड्यात लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली असून २३ जुलैपर्यंत १२ वीचे निकाल बोर्डाकडे पाठवा अशा सूचना सर्व महाविद्यालयांना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. २३ जुलै या मध्यरात्रीपर्यंत निकाल सबमिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयांनी निकाल वेळेत सबमिट केल्यास महिन्याच्या शेवटी १२ वीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
www.konkantoday.com