राजापुरात रिफायनरी समर्थक शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश

राजापूर तालुक्यातील सागवे विभागातील रिफायनरी समर्थक शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांनी पुन्हा एकदा शिवसेनेला जोरदार दणका दिला आहे. या विभागातील शिवसेनेच्या निष्ठावान महिला कार्यकर्त्या व जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर, सागवेचे माजी सरपंच विद्याधर राणे यांसह शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये जा हीर प्रवेश केला.भाजपचे प्रदेश चिटणीस व कणकवलीचे माजी आमदार प्रमोद जठार, भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर, तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल गुरुमाऊलीच्या सभागृहात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रवेशकर्त्या लक्ष्मी शिवलकर यांच्यासह प्रवेशकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, तालुका सरचिटणीस अ‍ॅड. सुशांत पवार, महिला तालुकाध्यक्ष श्रुती ताम्हनकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अमजद बोरकर, तालुका उपाध्यक्ष फैयाज नाटेकर, दीपक बेंद्रे, माजी नगरसेवक विलास पेडणेकर, पंढरीनाथ आंबेरकर, राजा काजवे, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष जब्बार काझी, कणकवलीचे माजी सभापती दिलीप तळेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button