
मुंबई, ठाण्यासह कोकणात आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज
किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे मुंबई, ठाणे परिसरासह संपूर्ण कोकण विभागात धुवाधार पाऊस सुरू असून, तो विक्रमाकडे वाटचाल करीत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशातील सर्वाधिक पाऊस रायगड जिल्ह्य़ातील उरणमध्ये, ४५० मिलिमीटर इतका नोंदविला गेला. त्यापाठोपाठ ठाण्यात २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
कमी दाबाचा पट्टा आणखी तीन ते चार दिवस कायम राहण्याची शक्यता असल्याने मुंबई, ठाण्यासह कोकणात आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील घाट भागांमध्ये या कालावधीत जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने कायम ठेवला आहे.
महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून कर्नाटक किनारपट्टीपर्यंत गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत्यामुळे कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. कोकणात नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे
www.konkantoday.com