
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रकिनारी मच्छिमाऱ्याला सापडलीआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींचा भावअसलेली देव माशाची उलटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रकिनारी मच्छिमाऱ्याला सापडलीआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधींचा भावअसलेली देव माशाची उलटी सापडली आहे
जिल्ह्यातील देवगड तारामुंबरी समुद्रकिनाऱ्यावर सुमारे पाच किलो वजनाची कोट्यावधी रुपये किंमतीची देव माशाची उलटी मच्छिमार उमाकांत विठ्ठल कुबल यांना आढळली. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देवगड येथे येत उलटी ताब्यात घेतली. बाजारपेठेत या उलटीला सोन्याचा भाव आहे. तसेच या उलटीची मोठ्या प्रमाणात तस्करी होते.
देवगड शिवनगर येथे राहत असलेले उमाकांत कुबल हे सकाळी मासेमारी करण्यासाठी तारामुंबरी समुद्रकिनारी गेले असता त्यांना स्मशानभूमी नदीच्या किनाऱ्यावर एक विशिष्ट पदार्थ दिसून आला. सदर पदार्थ कुत्रे खात असल्याचे दिसून आल्याने त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत कुत्र्यांना घालवून तो पदार्थ जवळून पाहिला असता सदर पदार्थ वेगळ्याच प्रकारचा असल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर प्रथम त्याचे फोटो काढून त्यांचे मित्र जे मुंबई येथे मत्स्य संशोधन संस्थेत काम करतात त्यांना व्हॉट्सअॅप वर पाठवले.
तांडेल यांनी फोटो पाहिल्यानंतर तो पदार्थ व्हेल माशाची उलटी असल्याचे कुबल यांना सांगितले. या उलटीला कोट्यावधीची किंमत आहे. या उलटीची तस्करी केली जाते. त्यामुळे याची माहिती वनविभागाला द्या अशीही सूचना दिली. त्यानुसार तांडेल यांनी कणकवली वनविभागाला याची माहिती देऊन कुबल यांचा संपर्क क्रमांक दिला कुबल यांनी तो पदार्थ एका प्लॅस्टिकच्या बॉटलमध्ये भरून वनविभागाच्या ताब्यात दिला. उलटी सदृश्य पदार्थाचा पंचनामा करून सदर उलटी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली सदरचा सापडलेला पदार्थ नेमका काय आहे याची वनविभागाकडून आता खात्री करून घेण्यात येणार आहेत
www.konkantoday.com
