
ग्रामपंचायतीच्या अधिकारांवर गदा नको,चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत एकमुखी ठराव
शासनाने ग्रामपंचायत कामकाजाबाबत नियमावली लागू केली आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीमधील सरपंच व सदस्यांना अनेक अधिकार बहाल केले आहेत. अधिकार्यांनी लाभासाठी ग्रामपंचायतीच्या अधिकारावर गदा आणू नये, असा एकमुखी ठराव चिपळूण तालुका सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आला.येथील पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी चिपळूण तालुका सरपंच संघटनेची बैठक अध्यक्ष योगेश शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सरपंच संघटनेचे पदाधिकारी आणि तालुक्यातील सरपंच बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून येथील प्रमुख अधिकारी ग्रामपंचायतीच्या कामकाजात विशेषतः वस्तू खरेदीत हस्तक्षेप करीत आहेत. चढ्या दराने शिवप्रतिमा खरेदी करण्यासाठीदेखील ग्रामपंचायतीवर दबाव टाकण्यात आला. मात्र सरपंच संघटनेने ठाम विरोध केल्यानंतर एकमुखी खरेदीचा प्रयत्न फसला. या प्रकरणाचे पडसाददेखील सरपंच संघटनेच्या बैठकीत उमटले. विकास कामे नियमानुसार कोणाला द्यायची, वस्तू कोठून घ्यायच्या याचे अधिकार ग्रामपंचायतीला आहेत. परजिल्ह्यातील ठेकेदार आणून येथील ग्रामपंचायतींवर त्यांना लादू नये, असे ठवणकावण्यात आले.www.konkantoday.com