महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपदीअमित ठाकरे यांची निवड केली जावी अशी मागणी जोर धरु लागली
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करून शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. तेव्हापासून रिकाम्या झालेल्या या पदावर मनसे नेते अमित ठाकरे यांची निवड केली जावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.
आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आता मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र मनसे नेते अमित ठाकरे यांच्याकडे दिली जावी, अशी मागणी मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांकडून होऊ लागली आहे.
www.konkantoday.com