
महाविकास आघाडीबाबत फॉर्म्युला रत्नागिरीपर्यंत आणायचा की नाही हे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठरवतील – मंत्री उदय सामंत
दापोली, मंडणगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा फॉर्म्युला यशस्वी झाला आहे. मात्र तो पुढे रत्नागिरीपर्यंत आणायचा की नाही हे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी ठरवतील असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यामुळे रत्नागिरीतील शिवसेनेतील इच्छूक निर्धास्त झाले आहेत.
नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत दापोली, मंडणगडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढविल्या होत्या. दापोलीत महाविकास आघाडीला निर्विवाद वर्चस्व मिळाले.
www.konkantoday.com