१० वी बोर्डाची वेबसाइट हॅक झाली का? याबाबत तपास करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली
काल दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या वेबसाईटवर वर निकाल जाहीर करण्यात येत होता. मात्र आता वेबसाईटचं क्रॅश झाल्याची माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला.
दरम्यान नुकत्यात हाती आलेल्या माहितीनुसार, १० वी बोर्डाची वेबसाइट हॅक झाली का? याबाबत तपास करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. वेबसाईट हॅक झाल्याचा संशय शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहेे. त्यासाठी यावर अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली असून समिती आपला अहवाल १५ दिवसात देणार आहे.
www.konkantoday.com