
सरकारने तातडीने ५०० कोटींची मदत करावी – खासदार सुनील तटकरे
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात साधारणत: ५ हजार कोटींचं नुकसान झालं आहे त्यामुळे राज्य सरकारने नियमित आणि प्रचलित नियम बाजूला ठेवून आपत्तीग्रस्तांना ५ हजार कोटींची मदत करावी. याशिवाय पंचनाम्याआधी सरकारने तातडीने ५०० कोटींची मदत करावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी केली आहे
चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त रायगड जिल्ह्याची पाहणी केली. त्यांनी रायगड जिल्ह्यासाठी १०० कोटींची मदत जाहीर केली आहे.दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी राज्य सरकारकडे नुकसानग्रस्त भागासाठी ५ हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी केली आहे.
‘निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रचंड नुकसान झालं आहे. माझ्या प्राथमिक अंदाजानुसार कोकणात साधारणत: ५ हजार कोटींचं नुकसान झालं आहे.
www.konkantoday.com




