
मा.खा. राहुल गांधी यांनी रत्नागिरी जिल्हा कार्यकर्त्यांशी साधला संवाद
काँग्रेसचे नेते खा. *मा. राहुल गांधी यांनी रत्नागिरी जिल्हा कार्यकर्त्यांशी झूम मीटिंग मधून १२ ते २ एवढा वेळ कार्यकर्त्या बरोबर बोलत होते. सदर सभेत देशातून सोशल मीडिया मधील ३००० कार्यकर्त्याचा समवेश केला होता कपिल नागवेकर यांनी रत्नागिरी मधील काँग्रेसची परिस्थितीचा आढावा दिला व राहुलजी गांधी यांना रत्नागिरी यायचे निमंत्रण देताना नेहरूजी सुद्धा रत्नागिरीला येवून सभा घेतल्याचे आठवण करून दिले. सदर झूम मीटिंग मध्ये राहुलजीनी कार्यकर्त्यांना तुम्ही काँग्रेस परिवार सदस्य आहात तुम्ही तुमच्या विभागात निडर बनून काम करत रहा लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत रहा असा संदेश दिला .सदर मीटिंग मध्ये मिडिया जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर,प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे,गुहागर तालुकाध्यक्ष रियाज ठाकूर, मकरंद जोशी यांनी राहुल गांधी यांचेबरोबर सवांद साधला
www.konkantoday.com