मंडणगड तालुक्यात आंबडवे-लोणंद मार्गावर दगड, मातीचा खच
मंडणगड तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असून आंबडवे-लोणंद या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यासह दगड मातीचा खच पडला आहे. मंडणगड, तुळशी, पाले, भिंगळोी याचबरोबर चिंचाळी, म्हाप्रळ या गावांचे अंतरादरम्यान गटार नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने गेल्या हंगामात रस्त्याच्या परिस्थितीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने पाऊस सुरू झाल्यापासून रस्त्यावरून संपर्क साधण्यात वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. www.konkantoday.com