बारसू-सोलगांव परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी पुढे सरसावले
रिफायनरी प्रकल्पासाठी शिवसेनेचा विरोध असताना बारसू-सोलगांव परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी पुढे सरसावले आहेत. बारसू-सोलगांव परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी सेनेचे नाटे विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुनिल राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ३६ जणांच्या प्रकल्प समर्थन समितीमध्ये सेनेच्या चार शाखाप्रमुखांसह तब्बल ५५ जण आता नव्याने सहभागी झाले आहेत. आता स्थानिक पातळीवर शिवसेनेतूनच रिफायनरी प्रकल्प समर्थनार्थ बाह्या सरसावल्या आहेत.
आता सोलगांव-बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्या ठिकाणी रिफायनरी उभारण्याबाबत सेना नेतृत्वाने आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र स्थानिक पातळीवर त्या परिसरातील शिवसैनिक आणि पदाधिकार्यांनी प्रकल्प समर्थनाचे झेंडे खांद्यावर घेतले. www.konkantoday.com