
दापोली माटवण फाटा येथे दोन बंदुका संशयिताकडून जप्त, आरोपीला अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीसअंमलदार अवैध धंद्याविरोधी कारवाईसाठी गस्त करीत असताना, त्यांना माटवण फाटा येथेएक व्यक्ती संशयास्पद स्थितीत असल्याचे दिसला. त्याच्याकडे एक प्लॅस्टीक गोणपाट होते.पोलीसांनी त्यांच्याकडे चौकशी करता व त्याची झडती घेता, त्याच्या ताब्यातील गोणपाटात एक सिंगल बॅरल काडतुसची बंदुकआणि एक सिंगल बैरल ठासणीची बंदुक अशा दोनबंदुका मिळून आल्या. सदर बंदुका बाळगणा-या आरोपीचे नांव प्रमोद एकनाथ नाचरे, वय२७ वर्षे, रा. पिसई, येसरेवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी असे सांगितले.सदर घटनेबाबत पोह. शांताराम मोरे, ने.- स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
यांच्या फिर्यादीवरुन दापोली पोलीस ठाणे गये गुनो.क्र.१६५/२०२१ अन्वये गुन्हा दाखलकरण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पो.उपनिरी, श्री निनाद कांबळे हे करीत आहेत.
यातील आरोपीस दि.१३/०७/२०२१ रोजी मा. न्यायालयात हजर केले असता, त्यास दंडाधिकारीय कोठडी देण्यात आली.मा. डॉ. मोहित कुमार गर्ग, पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कामगिरीत पोह. प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, शांताराम मोरे, बाळू पालकर, पोना. उत्तम सासवे, पोशि, दत्तात्रय कांबळे यांनी सहभाग घेतला. मा. पोलस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी वरील पथकाचे अभिनंदन केले आहे.
www.konkantoday.com