
केंद्र सरकारचा राज्याला ऑगस्ट महिन्यात निश्चित लससाठय़ापेक्षा अधिकचा साठा उपलब्ध करून दिल्याचा दावा
महाराष्ट्राला ऑगस्ट महिन्यात निश्चित केलेल्या ८६ लाख ७४ हजार लसमात्रांपेक्षा अधिक म्हणजेच ९१ लाख ८१ हजार मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या, असा दावा केंद्र सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे उच्च न्यायालयात के ला आहे.राज्य सरकारने लस तुटवडय़ाची तक्रोर के ल्याची दखल घेत न्यायालयाने केंद्र सरकारकडून लशींच्या वितरणाचा तपशील मागवला होता. त्यावर प्रतिज्ञापत्र दाखल करताना केंद्र सरकारने राज्याला ऑगस्ट महिन्यात निश्चित लससाठय़ापेक्षा अधिकचा साठा उपलब्ध करून दिल्याचा दावा केला.
www.konkantoday.com