वारकऱ्यांवरीलअन्याय न थांबवल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ दिले जाणार नाही – विश्व हिंदू परिषदेचा इशारा
राज्य सरकारने पंढरपूरच्या पायी वारीसाठी साधुसंत व वारकऱ्यांवरील अन्याय न थांबवल्यास मुख्यमंत्र्यांना पंढरपूरमध्ये शासकीय पूजेसाठी येऊ देणार नाही, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. हिंदूंच्या निरपराध संतांना अटक करून त्यांना अपराध्याची वागणूक देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांची तत्काळ माफी मागावी, अशी मागणीही प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांनी केली.
www.konkantoday.com