यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील, -भाजपाचे नेते निलेश राणे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये आघाडीवर असल्याचं एका सर्वेक्षणामधून समोर आलं आहे. मात्र या सर्वेक्षणाच्या निकालानंतर भाजपाचे नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत या सर्वेक्षणातील सॅम्पल साईजवरुन टोला लगावला आहे. निलेश राणे यांनी सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरलेल्या उद्धव ठाकरेंची तुलना ‘कोणत्याही जिमखान्याच्या अध्यक्षा’सोबत केलीय.१३ राज्यातील १७ हजार लोकांनी मतं दिली (आहेत.) भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. महाराष्ट्राची जवळपास ११.५ कोटी (लोक राहतात) आणि (देशात एकूण) राज्य २९ आहे. यापेक्षा जास्त मतं कुठल्याही जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील,” असं निलेश राणेंनी या सर्वेक्षणामधील सॅम्पल साइजच्या आकडेवारीची माहिती शेअर करत म्हटलं आहे.
www.konkantoday.com