इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या १६ जुलै,२०२१ रोजी दुपारी १:००वाजता जाहीर हाेणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या १६ जुलै,२०२१ रोजी दुपारी १:००वाजता जाहीर होईल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. या वर्षीची दहावीची परीक्षा करोना प्रादुर्भावाचा विचार करुन रद्द करण्यात आली होती. मात्र, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली होती.
www.konkantoday.com