लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज दिली मोठी भेट,महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढ
मागील काही महिन्यांपासून थकबाकीसह महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत असलेल्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारने आज मोठी भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वीच केंद्र सरकारने महागाई भत्ता वाढीसह थकबाकी देण्यास संमती दिली होती. मात्र, निर्णय कधी होणार याकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं होतं.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महागाई भत्त्यात तब्बल ११ टक्के वाढ करण्यात आली आहे.
www.konkantoday.com