रत्नागिरी पालिकेने पाणी वितरण व्यवस्था भक्कम करीत नगरपरिषदेने वरील खर्चाचा बोजा कमी केला
रत्नागिरी पालिकेने पाणी वितरण व्यवस्था भक्कम करीत शहरात शहरात मोठी सुधारणा केली आहे गेली कित्येक वर्षे खराब मुख्य जलवाहिनीमुळे होणारी गळती, पंप हाऊसमधील वर्षानुवर्षे वायंडींग केलेले तेच ते जुने विद्युत पंप, दुरूस्तीवर वर्षाला होणारा २० ते २५ लाख खर्च, महिन्याला २० ते २१ लाखांच्या विद्युत बिलाचा बोजा, असमाधानकारक पाणी, आदीमुळे पालिका मेटाकुटीला आली होती. मात्र नवीन टाकण्यात आलेली मुख्य जलवाहिनी, पावणे दोन कोटींचे नवीन बसविलेले तीन विद्युत पंपामुळे पालिकेची वर्षाला ५५ ते ६० लाखांची खसखशीत बचत होणार आहे.नगराध्यक्ष बंड्या साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी
शहरातील नागरिकांना दिलासा देत पाणी वितरण व्यवस्था भक्कम करणे हे उद्दिष्ट होते. म्हणून काही बदल केले. त्याचे दूरगामी परिणाम आता नागरिकांना आणि पालिकेला दिसणार आहेत. अनेक खर्च वाढून वीज बिलात बचत होत आहे. पालिकेवरील आर्थिक भार कमी होऊन नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे.
www.konkantoday.com