
गुहागर-विजापूर रस्ता रूंदीकरणाच्या निकृष्ट कामाचे अजब नमुने वर्षभरातच महामार्गाचे कॉंक्रीट उखडले
गुहागर-विजापूर रस्ता रूंदीकरणाच्या निकृष्ट कामाचे अजब नमुने पुढे येत आहेत. अगोदरच वादात सापडलेला हा मार्ग निकृष्ट कामामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एक वर्षातच या महामार्गावरील शृंगारतळी दरम्यान, रस्त्याचे कॉंक्रीट उखडले असून त्याच्या दुरूस्तीला पुन्हा सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रवासी, वाहनचालक यांनी संताप व्यक्त केला आहे.गुहागर-विजापूर रस्ता रूंदीकरणाचा बोजवारा सुरूवातीपासूनच उडालेला आहे. रस्त्याच्या कॉंक्रीटला तडे जाणे, निकृष्ट गटारांचे काम, पुलांचे कठडे, भिंती यांची कामे व्यवस्थित झालेली नाहीत. तडे गेलेल्या कॉंक्रीटला सिमेंटचा मुलामा लावून किंवा त्यामध्ये डांबर भरण्याचे प्रकार मध्यंतरी सुरू होते. आता रस्त्याचे कॉंक्रीटच उखडल्याने तेवढा भाग खणून काढून पुन्हा एकदा तो भाग कॉंक्रीटचा करण्यात येत आहे. www.konkantoday.com