तिसऱ्या लाटेकडे गांभीर्याने न पाहता हवामानाच्या अंदाजाप्रमाणे तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे पाहिले जात आहे -केंद्रीय आरोग्य मंत्रालय
करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. ही लाट म्हणजे हवामानाचा अंदाज नव्हे, अशी टिप्पणी करत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी नागरिकांच्या बेफिकीरीबद्दल चिंता व्यक्त केली. बाजार आणि पर्यटनस्थळी लोक मोठय़ा संख्येने गर्दी करू लागले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हवामानाचा अंदाज पाहून लोक पर्यटनाचे बेत आखतात. पाऊस सुरू होण्याआधी फिरून येतो, नंतर बाहेर पडता येणार नाही, असा विचार केला जातो. करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही लोक हाच विचार करत आहेत. दोन वर्षे घरात बसलो, आता तिसरी लाट येण्याआधी फिरून येतो, असे म्हणत लोक पर्यटनस्थळांवर गर्दी करत आहेत.तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. हवामानाच्या अंदाजाप्रमाणे तिसऱ्या लाटेच्या इशाऱ्याकडे पाहिले जात आहे,
www.konkantoday.com