रत्नागिरीत जिल्ह्याला १६ जुलै पर्यंत मुसळधार पावसाचा इशारा
भारतीय हवामान खात्याकडून आलेल्या इशाऱ्यनुसार जिल्ह्यत १६ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
रत्नागिरी तालुक्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तालुक्यातील सैतवडे गावात ढगफुटीगत पाऊस कोसळला. दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने गावातील जनजीवन विस्कळीत झाले.
मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने सैतवडे गावातील नद्या, नाले आणि ओढे जलमय झाले. ३० तासांपेक्षा अधिक काळ पावसाने विनाउसंत हजेरी लावली. यामुळे गावातील बहुतांश रस्ते पाण्याखाली गेले होते.
www.konkantoday.com