मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा केंद्र सरकारच्या लसी पुरवठा धोरणावर अप्रत्यक्ष निशाणा
एकीकडे कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचं सांगितलं जातंय. मात्र, दुसरीकडे लस घेण्यासाठी लसींचाच तुटवडा असल्याचं वारंवार उघड होतंय. यावरुनच आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या लसी पुरवठा धोरणावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. केंद्र सरकारने दिलेल्या २५लाख डोसेसचा साठा खासगी रुग्णालयांकडे आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
www.konkantoday.com