प्रशासकीय कारभार हाकणार्या राजापुर पंचायत समितीच्या इमारतीला गळती
राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा प्रशासकीय कारभार हाकणार्या पंचायत समितीच्या इमारतीला गळती लागली असून प्रशासकीय कामकाजाच्या फाईलींवर पावसाचे पाणी ठिबकत आहे. इमारतीखाली बसून अधिकारी आणि कर्मचार्यांना पावसाचे थेंब झेलत काम करावे लागत आहे. धोकादायक इमारतीमध्ये बसून प्रशासकीय कारभार करणार्या प्रशासनाच्या समस्येचे निवारण करण्याबाबत लोकप्रतिनिधी वा वरिष्ठ प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
.www.konkantoday.com