
रत्नागिरीसह अनेक भागात मुसळधार पाऊस ,राजापूर शहरात बाजारपेठेत पाणी शिरले
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून पावसाने जोर केला असून अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे राजापूर परिसरातील मुसळधार पावसामुळे कालपासून राजापूर शहरात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे नदीचे पाणी शहरात बाजारपेठेत सकाळपासून भरण्यास सुरुवात झाली शहरातील जवाहर चौक व बाजारपेठेत पाणी भरू लागल्याने व्यापार्याची तारांबळ उडाली राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिफे हे परिस्थितीवर जातीने लक्ष ठेवून आहेत राजापूर अर्जुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने झाल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
www.konkantoday.com