
उडान योजनेअंतर्गत नवी १०० विमानतळे सुरू करण्याचे उद्दिष्ट
उडान योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातून भारतातील आठ मार्गांवर विमानसेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज केली. ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली. सरकारने उडान योजनेअंतर्गत नवी १०० विमानतळे सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.आता १६ जुलैपासून नवी सेवा सुरू करण्याची घोषणा शिंदे यांनी केली आहे. त्यात मुंबई, पुणे, सुरत या शहरांसाठीच्या सेवेचा समावेश आहे.
www.konkantoday.com