पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता
पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा सर्वत्र चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे तर विदर्भातील काही जिल्ह्यात पुढील दोन दिवस चांगला पावसाची शक्यता आहे. १ जूनपासून तेआजपर्यंत महाराष्ट्रात सरासरी पाऊस बघायला मिळाला आहे. ज्यात मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
कोकणात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. कोकणात पुढील दोन दिवसाकरिता रेड अलर्ट देण्यात आला आहे. ज्यात प्रामुख्याने दक्षिण कोकणात म्हणजेच रत्नागिरी आणिसिंधुदुर्गात अतिमुसळधारेचा इशारा आहे. साधारणत: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील काही भागात दोनशे दहा मिमीपर्यंत पाऊस पडु शकतो.
www.konkantoday.com