
कोरोनानं फार दु:खं दिलं. त्यावर फुंकर घाला, बोध घेता घेता जगणं शिका -सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ
कोरोनानं भाकरी हिरावून घेतली काम थांबली. कोरोनात अशी वेळ आली की माझी लेकरं पाणी पिऊन झोपली. भाकरीची भूक पाण्यावर का भागत नाही असं प्रश्न लेकरं विचारत होती. त्या प्रश्नांना उत्तर देता आलं नाही. मात्र अनेकांनी या काळात थोडी फार होईना मदत केली असं सांगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. बोधमार्ग फाऊंडेशनच्या ऑनलाईन ‘बोधवारी या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला होता.
यावेळी सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, कोरोनानं फार दु:खं दिलं. त्यावर फुंकर घाला, बोध घेता घेता जगणं शिका. दुकानाची शटर बंद झाली पण पोटाची भूक बंद झाली नाही.
www.konkantoday.com