जिल्हा परिषद शाळांतील मुलांची संख्या वाढवण्यासाठी खेर्डीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मॉडेल स्कूल
गेल्या काही वर्षात विविध कारणांनी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. यावर उपाय म्हणून तालुकास्तरावर मॉडेल स्कूल उभारण्यात येणार आहे. हे मॉडेल स्कूल आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहणार आहे. शाळेसाठी आवश्यक त्या सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधा येथे उपलब्ध केल्या जाणार आहेत. या मॉडेल स्कूलसाठी चिपळूण तालुक्यातून खेर्डी दातेवाडी जिल्हा परिषद शाळा नं. १ ची निवड झाली असून त्याचा आराखडाही निश्चित करण्यात आला आहे. या मॉडेल स्कूलसाठी सुमारे सव्वादोन कोटींचा खर्च केला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद सीईओंनी पंचायत समितीस भेट दिली हाती. त्या वेळी झालेल्या चर्चेत जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर व पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे यांनी खेर्डी दत्तवाडी शाळेचे नाव मॉडेल स्कूलसाठी सुचविले होते. त्यानुसार शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी करीत तेथील विद्यार्थी संख्या, भौतिक परिसराची पाहणी केल्यानंतर राज्य सरकारकडून मॉडेल स्कूलसाठी या शाळेची निवड झाली.
www.konkantoday.com