
कोकणचे सुपुत्र दिग्दर्शक प्रकाश आत्माराम जाधव यांचा वेल डन बॉईज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
रमाबाई आंबेडकर, आम्ही चमकते तारे व श्यामची शाळा या मराठी चित्रपटांच्या घवघवीत यशानंतर साईनाथ चित्र यांची निर्मिती वेल डन बॉईज या नव्या कोर्या चित्रपटाचे चित्रिकरण व तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्या असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती कोकणचे सुपुत्र दिग्दर्शक प्रकाश आत्माराम जाधव यांनी दिली.
प्रकाश जाधव हे मुळचे रत्नागिरीतील कसोप गावातील. आपण आपल्या भूमीला काहीतरी देणे लागतो या उद्देशांना त्यांनी येथील बालकलाकारांना चित्रपटात संधी देण्याच्या हेतूने चमकते तारे, श्यामची शाळा, रमाबाई आंबेडकर हे तीन मराठी चित्रपट रत्नभूमीच्या सौंदर्यात तयार केले. कोकणचे सौंदर्य प्रेक्षकांपर्यंत पोचले. त्यामध्ये दिग्गज कलाकार व येथील छोटे विद्यार्थी-शिक्षक यांचा सहभाग होता. लॉकडाऊनच्या कालावधीत आणि येथील परिस्थितीला अनुसरून त्यांनी वेल डन बॉईज हा चित्रपट मुंबईत तयार झाला.
प्रकाश जााधव यांचे या अगोदरचे चित्रपट लहान मुलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारे होते. या चित्रपटात मोहन जोशी, विजय पाटकर, शिल्पा प्रभुलकर, प्रिय रंजन, विनोद जॉली, महेंद्र पाटील व आशिष निनगुरकर यांच्याबरोबर अनेक बालकलाकारांनी भूमिका साकारल्या असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
www.konkantoday.com
