
लोटे येथे महामार्गावर विजेच्या खांबाला वाहन धडकल्याने घाणेखुंट परिसरात वीज पुरवठा खंडीत
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरी रस्त्यामधील दुभाजकावर असलेल्या विजेच्या खांबाला शनिवार दि. ११ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामुळे खांब वाकला व विद्युत भारित तार महामार्गावर कोसळली. त्यामुळे तब्बल दीड ते दोन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक धिम्यागतीने होती. या अपघातानंतर घाणेखुंट परिसरातील बहुतांश भागात वीज पुरवठा खंडित झाला होता. वीज वितरण कर्मचार्यांनी रविवार दि. १२ रोजी सकाळी ११ वाजता वीज पुरवठा पुर्ववत करण्यात यश मिळवले. www.konkantoday.com