फी आकारणीच्या मुद्दय़ावरून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवू नका,मुंबई उच्च न्यायालय
फी भरली नाही म्हणून काही शाळांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवले आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत असून त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने शाळांची चांगलीच कानउघडणी केली. फी आकारणीच्या मुद्दय़ावरून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवू नका, या प्रश्नावर कोर्टाची पायरी न चढता पालकांसोबत सामंजस्याने तोडगा काढा, अशा शब्दांत न्यायमूर्तींनी शाळांना बजावले.
www.konkantoday.com