महाराष्ट्र सरकारला धनगर समाजाचा विसर

महाराष्ट्र राज्याचे दोन दिवशीय पावसाळी अधिवेशन दिनांक ५ व ६ जुलै २०२१ रोजी संपन्न झाले.या अधिवेशनात अनेक चांगले ठराव महाराष्ट्र सरकारने समंत करून घेतले.मराठा समाज,ओबीसी समाज व कैकडी समाज यांना आरक्षण मिळण्यासबंधी आवश्यक असणारे ठराव विधानसभा व विधानपरीषदेत एकमताने मंजूर करण्यात आले.
हि चांगली गोष्ट आहे.मराठा,ओबीसी,व कैकडी समाजाच्या आरक्षणाला धनगर समाजाचा विरोध नाही.

धनगर समाजाला घटनेने दिलेल्या ST आरक्षणाची अमलबजावणी करून धनगर समाजाला न्याय द्यावा हि धनगर समाजाची मागील अनेक वर्षांपासूनची मांगणी आहे.मागील देवेंद्रजी फडणविस सरकारने सत्तेवर आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याचे लेखी पत्र धनगर समाजाला दिले होते.पाच वर्षे सत्ता भोगली परंतू धनगर समाजाला आरक्षण दिल़े नाही.त्यावे‍ळेचे विरोधी पक्ष व आताचे सत्ताधारी काॅंग्रेस,राष्ट्रवादी यांनी धनगर समाजाला देवेंद्रजी फडणवीस सरकारने ST आरक्षण देण्यासाठी धनगरी वेशात विधानसभेच्या पाय-यांवर बसून आंदोलन केले होते हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे.विरोधी पक्षात असताना धनगर आरक्षणाची आठवण येते व सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाचा विसर पडतो हि प्रक्रीया महाराष्ट्रातील सत्ताधारी व विरोधी पक्षांची मागील ३५ वर्षे सुरू आहे.अशी फसवणूक भारत देशातील कोणत्याही समाजाची झाली नसेल.

महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या खालील महत्वाच्या तीन मांगण्यांना अधिवेशनात वाचा फोडण्यासाठी,धनगर ऐक्य परिषद महाराष्ट्र राज्य,या संघटनेतर्फे महाराष्ट्रातील २२७ विद्यमान आमदार,व काही वरीष्ठ मंत्रीमहोदयांना निवेदने देण्यात आली होती.
विषय :१) धनगर समाजाला एस.टी.आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा.
२) जे आदिवासी समाजाला ते धनगर समाजाला त्या सर्व योजना व मागील १ हजार कोटी व चालू आर्थिक वर्षाचे १ हजार कोटी असे एकूण २ हजार कोटी धनगर समाजासाठी त्वरीत उपलब्ध करून द्यावेत.
३) आमदार निधीतून किंवा आपल्या सहकार्यातुन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर किंवा राजे यशवंतराव होळकर यांचे भव्य स्मारक आपल्या तालुक्यात उभे करण्यात यावे.
वरील तीन मांगण्यांचे निवेदने देऊनही एकही आमदाराने पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाचा प्रश्न मांडला नाही.यावरून महाराष्ट्रातील सर्वच आमदारांची धनगर समाजाला न्याय देण्याची मानसिकता दिसून येत नाही.

पावसाळी अधिवेशनात धनगर समाजाच्या मांगण्यांची दखल सत्ताधारी व विरोधक दोन्ही बाजूंनी घेतली न गेल्याने महाराष्ट्रातील धनगर समाजाला कोणीही वाली नसल्याचे दिसून आले आहे.धनगर समाजाला फसवण्याचे कारस्थान सत्ताधारी व विरोधी दोन्ही बाजूने सातत्याने सुरू आहे.पुढील येणा-या सर्वच निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील नाराज धनगर समाज धनगर समाजाला वचने देऊन फसवणा-या सत्ताधारी व विरोधक यांना घरी बसवल्याशिवाय राहाणार नाही असा ईशारा कोकणातील धनगर समाजाचे आरक्षण लढयाचे नेते रामचंद्र आखाडे यांनी दिला आहे. रामचंद्र बाबू आखाडे जिल्हाध्यक्ष

महाराणी अहिल्यादेवी समाज
प्रबोधन मंच,रत्नागिरी
संपर्क नं : 9222807942

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button