
येत्या १० दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या वाढेल,-मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी
राज्य सरकारच्या मिशन बिगिन अगेन या धोरणातंर्गत शुक्रवारपासून दुकाने आणि इतर उद्योगधंदे पुन्हा सुरु करण्यात आले. त्यानुसार मुंबईही अनलॉक होईल. पण येत्या १० दिवसांत मुंबईतील रुग्णांची संख्या वाढेल, असा अंदाज मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी व्यक्त केला. आगामी काळातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड १९ रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्यासाठी महानगरपालिकेने डॅशबोर्ड तयार केल्याचे काकणी यांनी सांगितले.या डॅशबोर्डवर कुठल्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती मिळेल. सोमवारपासून हा डॅशबोर्ड कार्यान्वित होईल.
www.konkantoday.com