
पणदेरी धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश आल्याने तूर्तास धोका टळला
मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरणाला गळती लागल्याने धोका निर्माण झाला होता गेल्या दोन दिवसांच्या अथक मेहनतीनंतर काल बुधवारी दुपारनंतर पणदेरी धरणाची गळती रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. पाटबंधारे विभागाच्या विविध पथकांनी या ठिकाणी दिवसरात्र काम करून गळती थांबविली. तसेच धरणातील पाण्याची पातळी कमी करण्यासाठी कालवा व सांडव्यातून पाणी सोडण्यात आल्याने धरणावरील धोका तूर्तास टळला आहे. प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
www.konkantoday.com