
निवडणूक आयोगाकडून योग्यवेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यास जिल्ह्यातील नगरपरिषदांवर प्रशासन राजवट येण्याची शक्यता
रत्नागिरीसह जिल्ह्यातील इतर नगर परिषद व एका नगरपंचायतीची मुदत संपत असून त्याठिकाणी निवडणूक होणार आहे.रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक डिसेंबरला होईल असा अंदाज आहे. रत्नागिरीबरोबरच राजापूर, खेड ,चिपळूण व दापोली नगरपंचायतीची निवडणूक अपेक्षित आहे.मात्र असे असले तरी निवडणुका तारखा जाहीर होऊन त्याची प्रक्रिया होणे गरजेचे आहे.मात्र राज्य निवडणूक आयोगाकडून अद्यापही हा कार्यक्रम जाहीर झालेला नाही त्यामुळे ठरलेल्या वेळेत जर निवडणुका झाल्या नाहीत तर या नगरपरिषदांवर प्रशासक बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यानी देखील जिल्हाप्रशासनाकडे अर्ज करून निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी केली होती.
www.konkantoday.com