दाभोळ बाजारपेठेतील रस्त्याची दुरावस्था

दापोली तालुक्यातील दाभोळ बाजारपेठेतील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्याची चाळण झाली आहे. दाभोळमधून प्रवास करताना रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पहायला मिळतात. कोकणात पावसाचा जोर अधिक असतो. पावसामध्ये रस्त्यावरती वारंवार माती येणे ही दाभोळमधील नागरिकांची डोकेदुखी बनली आहे. गावातील वाहनधारक याच रस्त्याने ये-जा करत असतात. रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button