
कोकणातील कातळसडे, खाजण आणि देवरायात फुलपाखरांचा सर्वाधिक अधिवास
आंबोली, पारपोली, मार्लेश्वर, तिल्लारी, गगनबावडा, आंबाघाट, चांदोली परिसर, चिपळूण गुहागर, रत्नागिरी किनार्यावरील खाजण वने आदींसह कातळसडे आणि देवरायांत वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरांचा सर्वाधिक अधिवास असल्याचे प्रतिपादन देवरूख (संगमेश्वर) येथे आपल्या परसदारी फुलपाखरू उद्यान ही संकल्पना यशस्वी करणारे वन्य जीव अभ्यासक प्रतिक मोरे यांनी केले.
वन विभाग रत्नागिरी (चिपळूण) आणि मानव वन्यजीव रक्षक निलेश बापट यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील फुलपाखरांची जैवविविधता, संवर्धन आणि उद्यान निर्मिती या विषयावरील वेबिनार घेण्यात आले यावेळी व्याख्यानात मोरे बोलत होते.
www.konkantoday.com