पणदेरी धरणाच्या गळतीबाबत माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहितकुमार गर्ग पोलिस कुमके सह घटनास्थळी दाखल

आजसकाळी जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाला मंडणगड तालुक्यातील पणदेरी धरण फुटण्याची शक्यता असल्याची माहितीमिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ मोहीतकुमार गर्ग व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने गळतीमुळे कोणतीही जिवितहानी होवु नये म्हणुन तात्काळ धावघेतली. तसेच पोलीस मुख्यालय रत्नागिरी येथुन जादा कुमक म्हणुन १०० पोलीस अंमलदार रवाना करण्यातआले. तसेच आपत्कालीन साधन सामग्री, फायबर बोट, लाईफ जॅकेट, रिंग बोये, रोप, सर्च लाईट, स्ट्रेचर,प्रथमोपचार पेटी, इत्यादी साहित्य तात्काळ पोहचविण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने प्रत्यक्ष घटनास्थळी जावुन नागरीकांना धरण फुटुनकोणतीही जिवीतहानीहोवुनयेम्हणुनपी.ए.सिस्टीम व मेगाफोन व्दारे स्थलांतरीत होण्याबाबत आवाहनकरण्यात आले. स्थलांतरीत होण्याकरीता निर्माण होणा-या अडचणी समजुन घेवुन जास्तीत जास्त लोकांनास्थलांतरीत होण्याबाबत सांगण्यात आले. बौध्दवाडी, रोहिदासवाडी, कोंडगांव इत्यादी वाडीतील लोकांनामहसुल व पोलीसप्रशासनाच्यामदतीनेसुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याकरीता मदत केली आहे. तसेच सदरघटनास्थळी डॉ.मोहित कुमार गर्ग, जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री काशिद, उपविभागीय पोलीसअधिकारी खेड, श्री आंबरे, पोलीस निरीक्षक,मंडणगड पोलीस ठाणे, श्री पिठे, पोलीस निरीक्षक, बाणकोट पाेलीस ठाणे, यानी भेट देवुन नागरीकांना धीर दिला व त्याच्या अडीअडचणी व लागणारी साधन समग्री याबत माहिती घेतली. व जिल्हा पोलीस दल आपल्या मदतीसाठी सदैव तत्पर असुन इतर शासकीयस्थापनाशी समन्वय ठेवुन आवश्यक ती मदत करणेबाबत ग्वाही दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button