
दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांचा नामदार रामदास कदमांवर सनसनाटी आरोप
नामदार रामदास कदम यांनी आपल्यावर करणी केल्याचा सनसनाटी आरोप दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यानी केल्याने खळबळ उडाली आहे.माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला आपण नुकताच हृदयविकाराच्या आजारातून बरे झाले आहोत मात्र रामदास कदम यांनी आपल्यावर करणी केल्याने आपल्याला हा आजार झाला असे सांगून दळवी यांनी कदम हे करणी करण्यात माहीर असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला.दळवी यांच्या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.आपण आमदार होण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत इच्छुक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com