विधानसभा अध्यक्षांची ही कारवाई योग्यच असून राज्यपालही त्यावर काहीच करू शकत नाहीत, तज्ज्ञांचे मत
विधानसभा अध्यक्षांनी बेशिस्तीच्या वर्तनावरून भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे या निलंबित आमदारांनी राज्यपालांची भेट घेऊन कारवाई विरोधात दाद मागितली. तर आज भाजपने या कारवाईच्या विरोधात विधानसभेबाहेर प्रतिविधानसभा भरवून निषेध नोंदवला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांची ही कारवाई योग्यच असून राज्यपालही त्यावर काहीच करू शकत नाहीत, असं मत प्रसिद्ध वकील आणि राजकीय घडामोडींचे विश्लेषक अॅड. असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं आहे
www.konkantoday.com