राज्यभरात आतापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये पुरुषांची टक्केवारी अधिक
राज्यभरात आतापर्यंत झालेल्या लसीकरणामध्ये पुरुषांची टक्केवारी अधिक असून त्या तुलनेत महिलांचे लस घेण्याचे प्रमाण सुमारे नऊ टक्क््यांनी कमी आहे. रायगड, औरंगाबादमध्ये तर ही तफावत जवळपास १५ टक्के आहे. मुंबई, नाशिक, पुणे या शहरांमध्येही हा फरक ठळकपणे निदर्शनास येत आहे.
आरोग्य समस्या, लसीकरण यांबाबत महिलांना पुरुषांच्या तुलनेत प्राधान्य दिले जात नसल्याचे देशभरात प्रथमच एवढ्या मोठ्या पातळीवर राबविलेल्या प्रौढांच्या लसीकरणामध्येही निदर्शनास येते. देशात लसीकरणात पुरुष आणि महिलांच्या प्रमाणात तफावत असून लस घेतलेल्यांमध्ये ५४ टक्के पुरुष, तर ४६ टक्के महिला आहेत.
www.konkantoday.com