रनप व सोहेल मुकादम यांच्या प्रयत्नाने परदेशात जाणाऱ्या युवकांना देण्यात आली लस

रत्नागिरी :-परदेशी नोकरी व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरीच्या मेस्त्री हायस्कूल येथे कोव्हिशिल्डचे लसीकरणाचे आयोजन करून सुमारे 160 जणांना लसीकरण करण्यात आले. सोहेल मुकादम यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी मध्ये हा तिसरा कॅम्प घेण्यात आला.
परदेशी नोकरी व शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांना कोरोनाची लस मिळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या 45 वयाच्या खालच्या लोकांना लस देण्यात येत नव्हती त्यामुळे नोकरी निमित्ताने परदेशात जाऊन काम काम करणारे अनेक युवक सुट्टी निमित्ताने आपआपल्या गावी आले होते. त्यांना कोरोना लस घेतल्याशिवाय परदेशात जाता येत नव्हते त्यामुळे त्यांना मोठी अडचण निर्माण झाली होती. ही अडचण लक्षात घेवून त्यांना लस मिळावी या हेतूने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत, नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी तसेच नगरसेवक सूहेल मुकादम, सामाजिक कार्यकर्ते रमजान गोलंदाज यांच्या पाठपुराव्यामुळे तातडीने निर्णय घेत रत्नागिरीच्या मेस्त्री हायस्कूल येथे कोव्हिशिल्डचे लसीकरणाचे आयोजन करून सुमारे 160 परदेशात जाणाऱ्या युवकांना लसीकरण करण्यात आले.सोहेल मुकादम यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी मध्ये हा तिसरा कॅम्प घेण्यात आला. या पूर्वी चे दोन कॅम्प हे गीता भवन येथे आयोजित करण्यात आले होते.
या युवकांना लसीकरण होण्यासाठी सोहेल मुकादम, रमजान गोलंदाज, फैय्याज मुकादम, अल्ताफ संगमेश्वरी, जमूरत अलजी, शकील मोडक, शकील गवानकर, दिलावर कोंडकरी यांनी पाठपुरावा करत लसीकरणचे आयोजन केले. रत्नागिरीत आज पर्यत तीन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सोहेल मुकादम यांनी महत्त्वची भूमिका पार पाडली.
यामध्ये अनेकांनी मदत केली असून लसीकरण यशस्वी होणे करिता मुसा काझी,रमजान गोलंदाज,जमुरात अलजी,तैमूर अलजी, शकील मोडक, फैयाज मुकादम,समीर भाटकर, इरफान साखरकर, आदील फणसोपकर अझीम , सुहेल लाला , साजिद साई,मोहसीन खान, मुद्दसर बोरकर, शकील गवाणकर, बाबू शिरगावकर, नाकाडे, नाझिम मजगावकर,मुन्ना बांगी,बिलाल माद्रे
,मुज्जू मुकादम, मुकेश गुंदेजा, आदिल फनसोपकर,
,निलेश जाधव, प्रतीक खैरे, आदि. मेहनत घेतली. यावेळी तहसीलदार रत्नागिरी,नगरपरिषद रत्नागिरीचे कर्मचारी, आरोग्य विभागाच्या कर्मचारी, आदीचे आभार मांडण्यात आले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button