
संजीव साळवी राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा
रत्नागिरी -युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशन संचलित वाय फाय फोटोलव्हर्स आणि 95 फॅमिली आयोजित राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरीचे सुपुत्र संजीव साळवी हे महाराष्ट्र आणि गोव्यातील मॉडलिंग फोटोग्राफीसाठी अतिशय प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व होते. गेल्यावर्षी अचानकच त्यांचं निधन झालं. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या 1995 च्या माजी विद्यार्थ्यांनी 95 कलाकार ग्रुपने संजीव साळवी यांची स्मृती रहावी यासाठी युथ फेस्टिवल आर्टिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने या फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन केले आहे. गेली दोन वर्ष महाराष्ट्राभर अनेक नामवंत फोटोग्राफर संघटित करून वायफा फोटोलव्हर्स ग्रुप मार्फत अनेक राज्यस्तरीय फोटोग्राफीच्या अनेक विषयावर सतत उपक्रम राबवले जातात.
” संजीव साळवी राज्यस्तरीय फोटोग्राफी स्पर्धा ” ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. या स्पर्धेच स्वरूप याप्रमाणे राहील.
●स्पर्धेसाठी विनामूल्य प्रवेश असेल.
●13 जुलैपर्यंत आपले मॉडेलिंग फोटोग्राफी किंवा पोट्रेट फोटोग्राफी या विभागातील आपला सर्वोत्तम फोटो पाठवायचा आहे.
●सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे ई-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
●विजेत्या स्पर्धकांना रोख रकमेची पारितोषिके देण्यात येतील.
●स्पर्धेचा निकाल 14 जुलै 2021 रोजी म्हणजे संजीव साळवीची स्मृती दिनी जाहीर होईल.
● स्पर्धा सर्व वयोगटासाठी खुली राहील.
●फोटोग्राफीसाठी कॅमेरा किंवा मोबाइलचा वापर करू शकता.
●स्पर्धेचे सर्व हक्क आयोजकांकडे राहतील.
स्पर्धेबाबत संपर्क करण्यासाठी 7038445867 प्रा.शुभम पांचाळ यांच्याशी संपर्क साधावा. सदर स्पर्धेचे संयोजन श्री. बिपिन बंदरकर डॉ. आनंद आंबेकर आणि कुणाल संजीव साळवी करत आहेत. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.