
रत्नागिरी येथील तरुण व्यापारी व कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी व्यापारी महासंघाने पुढाकार घ्यावा
रत्नागिरी जिल्ह्यात बऱ्याचशा प्रमाणात व्यापार उद्योग सुरू होत आहेत रत्नागिरी जिल्हा अद्यापही चौथ्या टप्प्यात आहे जिल्ह्यात अनेक ठिकाणी व्यावसायिकांवर राेज पोलिसांकडून कारवाई केली जात आहे रत्नागिरीतील अनेक व्यापारी तरुण असून अनेक व्यापाऱ्यांना व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेली नाही वयाच्या अटीमुळे त्यांचे लसीकरण लांबले आहे उद्योग व्यवसाय सुरू होत असल्याने राहिलेल्या व्यापारी व कर्मचार्यांचे लसीकरण तातडीने होणे महत्त्वाचे आहे शासनाच्यावतीने १८ ते ४४ वर्षासाठीचे लसीकरण सुरू झाले आहे याशिवाय नामदार उदय सामंत यांनी आपल्या मतदारसंघात १८ ते २९वर्षांच्या व्यक्तींसाठी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जाहीर केला असून त्याला लवकरच सुरुवात होणार आहे रत्नागिरी व्यापारी महासंघाने प्रयत्न केल्यास व नामदार उदय सामंत यांच्याकडे आग्रह धरल्यास रत्नागिरी शहरातील व मतदारसंघातील तरुण व्यापाऱ्यांना व त्यांच्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांना वेगळे लसीकरण शिबिर आयोजित करून प्राधान्याने लसीकरण होऊ शकते बाजारपेठा उघडल्यामुळे किंवा दुकाने उघडल्यामुळे कराेनाचा प्रसार होऊ शकतो असे प्रशासनाला व शासनाला वाटल्याने व्यापाऱ्यांवर आतापर्यंत बंधने घातली गेली आहेत सर्व दुकाने उघडण्यात आल्यावर लसीकरणाच्या मुद्द्यावरून परत व्यापाऱ्यांवर बंधने येण्यापेक्षा प्राधान्याने तरुण व्यापारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्यास व्यापाऱ्यांना व्यापार करण्यास आगामी काळात अडचणी येऊ शकणार नाहीत व व्यापाऱ्यांनाही सुरक्षितता मिळू शकेल
www.konkantoday.com