मोबाइल लसीकरणाबाबत मारलेला तीर चुकीच्या ठिकाणी,ज्या तारखाना नगरपरिषदेने शिबिरच आयोजित केले नाही त्याला होय कसे म्हणणार आयोजकांचा दावा
रत्नागिरी शहरात मे महिन्यात झालेल्या मोबाइल लसीकरणावर वाद सुरू आहे लसीकरण अनधिकृत असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे भाजप माजी आमदार विनय नातु यांनी रत्नागिरी नगर परिषदेमध्ये मे महिन्यातील २७, २८ ,२९ मे ला लसीकरणाला परवानगी दिली का असा पत्र दिले होते व त्यावर खुलासा मागितला होता त्याला नगरपरिषदेने आम्ही परवानगी दिली नसल्याचे कळविले होते त्यामुळे या तारखाना झालेले मोबाइल लसीकरण अनेक अनधिकृत असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात होता व त्यामुळे जनतेत गैरसमज पसरले होते व विरोधकांकडून या प्रकरणाची चौकशीची मागणीही करण्यात आली होती मुळात रत्नागिरी नगर परिषदेकडून डॉ विनय नातू यांनी पत्रात नमूद केलेल्या तारखाना कोणताही लसीकरण कार्यक्रम आयोजित केले नव्हते त्यामुळे त्याला नगर परिषदेने परवानगी नाही म्हणूनच उत्तर दिले गेले रत्नागिरी नगरपरिषदेने तीस मे रोजी लसीकरण शिबिर आयोजित केले होते त्यांना मंत्री व नगराध्यक्षांनी हजेरी लावली होती त्यामुळे ते शिबीर अधिकृतच होते असा दावा आयोजकांनी केला आहे विरोधकांकडून चुकीच्या तारखांची माहिती मागितली गेली त्यामुळे त्याला नगरपरिषदेकडून तशा पध्दतीचे उत्तर आले त्यामुळे विरोधकांकडून लक्ष्याला अडचणीत आणण्यासाठी मारलेला बाण चुकीच्या ठिकाणी बसल्याने विरोधकांच्या हाती काही लागले नसल्याचे बोलले जात आहे
रत्नागिरी शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्यांने मोबाइल लसीकरणाची कल्पना मांडल्यावर त्याला जिल्हा परिषद आरोग्य विभागाने परवानगी दिली होती त्याचा शुभारंभ जि प अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी केला होता या शिबिरात झालेले लसीकरण जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत केले गेल्याने त्याठिकाणी त्यांचं कर्मचारीवर्ग होता या शिबिरात लस घेतलेल्या सर्व लोकांना
शासनाकडून सर्टिफिकेट देखील आल्याने ही शिबिरे अधिकृतच असल्याचे सिद्ध झाले आहे असे आयोजकांचे म्हणणे आहे त्यामुळे चांगल्या कामासाठी पुढे आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना राजकीय राजकीय चढाओढीत न ओढता त्यांचा हेतू लक्षात घेऊन व समाजासाठी किती फायदा होत आहे या सर्वांनी पाहणे जरुरीचे असल्याची अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त केली जात आहे
www.konkantoday.com