मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग कामासाठी २१८ कोटींचा भरीव निधी मंजूर
शिवसेना संसदीय गटनेते तथा खासदार विनायक राऊत यांनी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच ६६) वरील अनेक प्रलंबित कामांना मंजुरी मिळून निधी मिळवा, यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी व संबंधित मंत्रालयांचे सेक्रेटरी यांच्याकडे वेळोवेळी यशस्वी पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाच्या वार्षिक नियोजन सन २०२१-२२ अंतर्गत विविध कामांसाठी एकूण २१८ कोटी रुपये एवढा भरीव निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता या महामार्गाचे उर्वरित काम आणखी जलद गतीने होणार आहे.
www.konkantoday.com