पर्यटनाला चालना देण्यासाठी चिपळूण अर्बन बँकेची शासनाच्या महिला प्रवर्गासाठी असलेल्या आई पर्यटन धोरणांतर्गत व्याज परतावा कर्ज योजना सुरू

. कोकणात पर्यटन क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. याच पर्यटनाला चालना देण्यासाठी चिपळूण अर्बन बँकेने शासनाच्या महिला प्रवर्गासाठी असलेल्या आई पर्यटन धोरणांतर्गत व्याज परतावा कर्ज योजना सुरू केली आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल यांनी दिली.गुहागर तालुक्यातील चिपळूण अर्बन बँकेच्या शाखांच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. गुहागर येथील शाखेत ग्राहकांशी संवाद साधला. या वेळी सोबत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई, संचालक धनंजय खातू, प्रशांत शिरगावकर, गुहागरचे शाखा अधिकारी संतोष संसारे, अधिकारी रजनी सकपाळ आधी उपस्थित होते. या प्रसंगी मिरगल म्हणाले, महिला प्रवर्गासाठी असलेल्या आई पर्यटन धोरणांतर्गत बिच शॅक, साहसी पर्यटन, पर्यटन सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होम स्टे, निवास व न्याहारी, रिसॉर्ट, हॉटेल, हाऊस बोट, टेंटट्री हाऊस, व्होकेशनल हाऊस, पर्यटन व्हिला, वुडन कॉटेजेस, पॉडस, महाभ्रमण, रेस्टॉरंट, उपहारगृह, फास्ट फूड, महिला चलित कॉमन किचन, कॅफे, बेकरी, टूर ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, टूर मार्गदर्शक, क्रुज, टूर अॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सी, आर्ट अॅण्ड क्राफ्ट व्हिलेज, टुरिस्ट ट्रान्स्पोटर्स ऑपरेटर, हाऊसबोट, निसर्ग पर्यटनाशी संबंधित प्रकल्प, मेडिकल पर्यटन, वेलनेस सेंटर, आयुर्वेदा योगा केंद्र इतर पर्यटन व्यवसाय पर्यटकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या फायदेशीर ठरणार आहे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मोहन मिरगल यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button