भाजपच्या निलंबित आमदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या तुफान राड्यानंतर भाजपच्या १२ आमदारांवर सरकारकडून १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यानंतर भाजपच्या निलंबित आमदारांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. सरकारने केलेल्या कारवाईचा आणि आरोपांचा अहवाल मागवा अशी मागणी या आमदारांनी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे केलीय. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर भाजप आमदारांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर आशिष शेलार, संजय कुटे यांनी सरकारवर तोफ डागलीय.सभागृहातच नाही तर अन्य कुठेही भाजपच्या एकाही सदस्याने अपशब्द उच्चारला नाही. झालेली कारवाई एकतर्फी आहे. आम्हाला आमचं म्हणणं मांडू दिलं जात नाही. काहीजणांकडून सोशल मीडियावर पसरवले जात असलेल्या व्हिडीओमध्ये असं कुठेही दिसून येत नाही की, भाजप आमदारांनी सभागृहाचा किंवा तालिका अध्यक्षांचा अवमान केलाय, असा दावा शेलार यांनी केलाय
www.konkantoday.com