
चिपळुणात दागिन्यांसह रोख रकमेची चोरी
चिपळूण शहरातील खेंड परिसरात एका घरातून दागिने व रोख रक्कम असा १ लाख ३६ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली.
कापडी यांचे खेंड येथे घर असून घराच्या मागील बाजूने चोरट्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केला. यावेळी कापडी यांनी घरातील डायनिंग टेबलवर ठेवलेली पर्स व त्यामध्ये ठेवलेले ९० हजार ६०० रुपये किंमतीचा सोन्याचा राणीहार व ४६ हजार रुपयांची रोख रक्कम अशी १ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज या चोरट्यांनी चोरून नेला.
www.konkantoday.com